Site icon ets Daily

पुण्यात तुम्हाला प्यूअर शुद्ध बकरा किंवा बोकड किंवा बकर्‍याचे मटण कुठे मिळू शकते?

पुण्यात ‘बोलाई’ हा शब्द ऐकून कंटाळा आला आहे,

जरी बोलाई मटण, म्हणजे मेंढीचं मटण, याचा धार्मिक इतिहास आहे आणि त्यामुळेच पुणेकर शेळी किंवा बकरा किंवा बोकडाचं मटण खात नाहीत

पण तुम्ही जर नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायासाठी पुण्याबाहेरून आला आहात तर इथे आम्ही नेहमी खातो ते बकऱ्याचं मटण कसं खायचं?

इथे बरेच लोकं आहेत ज्यांना बोलाईचा स्वाद आवडत नाही, म्हणून ते घरी जाण्याची वाट बघतात आणि घरी बकऱ्याचं मटण खातात.

पण पुण्यात अशी काही मटणाची दुकानं आहेत का जिथे खरं बकऱ्याचं मटण मिळतं? किंवा अशी काही रेस्टॉरंट्स आहेत का जिथे फक्त बकऱ्याचं मटण मिळतं, बोलाई मटण नाही?

जर तुम्हाला अशा बकर्‍याच्या मटणाच्या दुकानाबद्दल किंवा रेस्टॉरंटबद्दल माहिती असेल जिथे मटण मिळते, तर कृपया या ब्लॉगवर कमेंट करा, जेणेकरून आम्हां सर्वांनाही पुण्यात बकर्‍याच्या मटणाचा आनंद घेता येईल.

त्यामुळे गावाला गेल्यावर महिनोन्महिने किंवा वर्षानुवर्षे मटण खाण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही.

जर कोणी ही माहिती सांगितली असती, तर आम्हाला इतक्या आतुरतेने आमच्या गावी जाऊन बकऱ्याचे मटण खाण्यासाठी इतकी वाट पाहावी लागणार नाही.

आम्हाला हे दोन युट्युब व्हिडिओ सापडले आहेत,

https://maps.app.goo.gl/J6G1CU95a86semYV7?g_st=iwb

ज्यात ते दावा करतात की वाकडमधील हे रेस्टॉरंट बोकड मटण (बकरा मटण) देते.

आम्हाला याची सत्यता नक्की माहीत नाही.

त्यामुळे, जर तुम्ही इथले मटण खाल्ले असेल आणि ते तुमच्या गावी मिळणाऱ्या मटणासारखेच लागत असेल, तर कृपया खाली कमेंट करून सांगा.

आणि जर तुम्हाला बकरा मटणाचे दुकान किंवा रेस्टॉरंट माहीत असेल, जिथे बकरा मटण मिळते, तर कृपया ते आमच्यासोबत कमेंटमध्ये शेअर करा.

Exit mobile version